लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर ?
मुंबई/दि. 8 - पुढील वर्षी देशात संसदीय सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच मतदारसंघांचा आढावा घेण्याचे काम बहुतांश राजकीय पक्षांकडून केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चार पावले पुढे जात लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 10 नावांचा समावेश आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या संभाव्य उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसेच्या यादीत मुंबई ते छत्रपती संभाजी नगरपर्यंतच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व निवडणुका लढवण्याची आणि सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती आणि कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आता 10 लोकसभा जागांसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनसेकडून अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या यादीत ज्यांची आधीच चर्चा होती तीच नावे दिसत आहेत.
यात पुण्यातून वसंत मोर , कल्याण मधून आमदार राजू पाटील , ठाणे मधून अभिजीत पानसे /अविनाश जाधव ,दक्षिण मुंबई मधून बाळा नांदगावकर ,छत्रपती संभाजी नगर मधून प्रकाश महाजन ,सोलापूर मधून दिलीप धोत्रे ,चंद्रपूर मधून राजू उंबरकर व रायगड मधून वैभव खेडेकर
लेबल: batmya
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ